भारतीय गणित परंपरेचा अग्रदूत : श्रीनिवास रामानुजन यांच्या (२६ एप्रिल) स्मृतिदिनानिमित्त Srinivas Ramanujan : Great Mathematician
महानतम गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या (२६ एप्रिल) स्मृतिदिनानिमित्त © ‘ शून्या ’ च्या शोधाकडे भारतीयांचा सर्वात महत्वाचा शोध म्हणून पाहिले जाते. ‘ शून्या ’ च्या शोधामुळे केवळ गणितक्षेत्रालाच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रांना एक नवा आयाम मिळाला. एके काळी गणितात अग्रस्थानी असणाऱ्या भारतात आज गणित एक कठीण आणि गंभीर विषय समजला जातो. भारतीयांमध्ये गणिताबद्दल गोडी निर्माण करण्यासाठी भारतीय गणितज्ञांच्या कार्याची ओळख करून देण्याची गरज आहे. जगातील महानतम गणितज्ञामध्ये गणले जाणारे , महान भौतिकी अल्बर्ट आइन्सटाईन यांच्या तोडीचे गणिताचे जादुगार श्रीनिवास रामानुजन यांचा (आज) २६ एप्रिल हा स्मृतिदिन आहे. तमा म विद्यार्थ्यांना आणि गणितप्रेमींना या लेखातून महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला...