Ramnavami : Shri Ram The Greatest Man
श्रीराम : मर्यादा पुरुषोत्तम !
हिंदूंचे आदर्श आणि आबालवृद्धांचे लाडके दैवत व श्री विष्णूचा सातवा अवतार
श्रीरामाचा जन्मदिवस चैत्र शुद्ध नवमीला ( यंदा ३० मार्च ) देशभरात हर्षोल्लासात
साजरा केला जातो. या दिवशी पुष्य नक्षत्रावर,
माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह
असताना अयोध्येत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला असे मानतात. जगाच्या कल्याणासाठी,
धर्मरक्षणासाठी आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी विष्णूंनी श्रीरामाचा
अवतार घेतला. ‘मर्यादा पुरुषोत्तम’ श्रीराम
हे एक आदर्श पुत्र, बंधू, पति, स्वामी, धर्मरक्षक, कर्तव्यदक्ष,
प्रजापालक, पितृवचन पालक, मातृभक्त आणि एकवचनी असे आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांचे जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य,
औदार्य वंदनीय आणि आचरणीय ठरावे, असे होते.
त्यांची कथा जशी पावन तसे त्यांचे नाव सुद्धा पापनाशक, संकटमोचक,
भक्तरक्षक आहे. ज्याच्या
नामोलेखनाने जर पाण्यावर पाषाण तरले, तर श्रद्धा, भक्ती व निष्ठापूर्वक श्रीरामाचे नाव घेणारा ह्या भवसागरी नक्कीच तरणार.
सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा !! -प्रा. विजय कोष्टी.
Comments
Post a Comment