1 April: April Fool जागतिक मूर्ख दिवस
१ एप्रिल (1 April) हा दिवस जागतिक मूर्ख दिवस किंवा जागतिक बकरा दिवस अर्थात ‘ एप्रिल फूल ’ (April Fool) म्हणून अनेक देशात साजरा केला जातो . या दिवशी प्रत्येक जण दुसऱ्याला मूर्ख बनवत असतो , तर मूर्ख बनलेल्याला ही इतर दिवसांप्रमाणे या दिवशी मूर्ख बनविणाऱ्याचा राग येत नाही , हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे . तथापि , यावर्षी पुनः एकदा वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणीही यादिवशी एप्रिल फूल च्या नावाखाली खोट्या अफवा , संदेश पसरवू नयेत . किंबहुना , सद्यस्थितीत समाजमाध्यमांचा अत्यावश्यक कामांसाठीच वापर करावा असे वाटते . या दिवसाची सुरुवात केव्हा , कोठे आणि कशी झाली ? विविध देशांमध्ये हा दिवस कसा साजरा केला जातो , त्यामागे कोणत्या अख्यायिका आहेत आणि भारताच्या दृष्टीने याचे महत्व काय आहे आदी बाबींचा यानिमित्ताने थोडक्यात घेतलेला आढावा ..... © जागतिक मूर्ख दिन ...